जालना शहरात बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणार्या महिलेवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर माल जप्त केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 81 हजार 140 रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रईसोद्दीन फजोद्दीन ईनामदार यांनी फिर्याद दिली आहे. ते एका नामांकित सौंदर्यप्रसाधन उत्पादन करणार्या कंपनीत वरिष्ठ तपासणी अधिकारी म्हणून कार्यरत असून, कंपनीच्या वस्तूंची नक्कल करीत होते.