रामटेक: तहसील कार्यालय रामटेक वर धडकला आदिवासींचा आरक्षण बचाव महा आक्रोश मोर्चा
Ramtek, Nagpur | Oct 9, 2025 आदिवासी बांधवांना शासनाद्वारे देण्यात आलेल्या आरक्षणात बंजारा, धनगर व अन्य काही समाजाला समाविष्ट करावे या बंजारा, धनगर समाजाच्या मागणीला तीव्र विरोध करीत गुरुवार दि. 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजतापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर रामटेक येथून गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी कृती समिती व आदिवासी कर्मचारी संघटना रामटेक तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय रामटेक पर्यंत भव्य आरक्षण बचाव महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर एसडीओ प्रियेष महाजन यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.