पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीमध्ये कोळी शिवारात रविवार दिनांक 8 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास मालवाहू ट्रकला अचानक आग लागली ही आग विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने लागली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तरी ट्रकच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.