कळमनूरी: चाफनाथ शिवारात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले, कळमनुरी महसूल पथकाची कारवाई
कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ शिवारात वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली,यावरून पथकातील मंडलाधिकारी आनंद काकडे ग्राम महसूल अधिकारी महेश गळाकाटू ,विशाल पतंगे, एकनाथ कदम यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन वाळू वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आल्याची माहिती आज दि. 6 नोव्हेंबर रोजी महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे .