दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातुन अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आज दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विदुर अशोक जाधव (वय ३५ वर्षे, रा. पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी आपली ४५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. एमएच ३७ सीएस १६५३) ही वाहन दिग्रसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लावली होती.