यवतमाळ: शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘’मनसे गरबा उत्सव २०२५’’ चा शुभारंभ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील नवरात्रीनिमित्त 'मनसे गरबा उत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. हे तिसरे वर्ष असून या निमित्ताने नागरिकांसाठी मोफत गरबा प्रशिक्षणाचे वर्ग आणि नऊ दिवसांच्या गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे शुभारंभ दिनांक 14 सप्टेंबर रोजी गेम ऑन टर्फ सरकारी दवाखान्यासमोर करण्यात आले आहे.