कन्नड: औट्रम बोगदा माझ्या काळातच मंजूर – माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा भाजपला पलटवार
औट्रम बोगदा काम संदर्भात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे बारा वाजता खुलासा केला कि औट्रम घाट बोगदा कामाबाबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा खुलासा केला आहे.भाजपचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे काम त्यांच्या प्रयत्नांतून सुरू झाल्याचा दावा करत आहेत.परंतु हे काम माझ्या आमदारकीच्या काळातच मंजूर झाले होते, असे जाधव यांनी सांगितले.या संदर्भातील पत्रे आणि कात्रणे माझ्याकडे आजही आहेत, असेही त्यांनी नमूद केले.