लाखनी: सिंदिपार येथे वाघाचा हल्ला; गायीला गंभीर दुखापत
सिंदिपार (मुंडेपार) येथील शेतकरी श्री. विश्वनाथ मोडकू कटरे यांच्या मालकीच्या गायीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना कक्ष क्रमांक 110 पीएफ (संरक्षित वनक्षेत्र) येथे घडली असून गायीला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्यात गायीच्या मानेच्या दोन्ही बाजूंना तसेच पाठीच्या भागात गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने घटनेचा तपास सुरू केला आहे.