अंबरनाथ: ते साडी घालून आले,दारावरची बेल वाजवली, मग हळद फेकली, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्लॅन फसला
मागील काही दिवसांपासून मुलं चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्येच आता बदलापूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली. मुलं चोरण्याच्या हेतूने चार जणांचे टोळके साड्या घालून इमारतीत शिरले आणि एक जण वर गेला.दार उघडण्यासाठी जबरदस्ती करू लागला, दार उघडले नाही तर तुझे वाईट होईल म्हणून हळद फेकू लागला. मात्र खालच्या नागरिकांना संशय आल्यामुळे तेव्हा आले आणि त्याला पकडले.मात्र त्याचे साथीदार तेथून पळून गेले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले अन त्याला ताब्यात घेतले आहे.