उंबर्डा बाजार येथील मोटार सायकल स्वाराचा दारव्हा रोड वर अपघात झाल्याची घटना दि. 25 ऑक्टोबर रोजी रात्री पावने दहा वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सदर अपघाताची माहिती माहिती बबलु शेख व महेबुब खान यांनी शिवनेरी रुग्णवाहिका चालक विनोद खोंड यांना भ्रमणध्वनी दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून गणेश देशमुख रा. उंबर्डाबाजार या जखमी रुग्णास रुग्णवाहीकेद्वारे पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.