बुलढाणा: बुलढाण्यात मतांचा घोळ आणि बोगस मतदान करून महायुतीच्या उमेदवाराचा निसटता विजय,उभाठा प्रवक्त्या जयश्री शेळके यांचा आरोप
आज दुपारी बुलढाणा येथील हॉटेल रामाग्रांड मध्ये शिवसेना उभाठा राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषद घेऊन बुलढाणा विधानसभेतील मतदार यादीचा मोठा घोळ समोर आणला आहे.विधानसभेत 7500 पर्यंत मतदारांची नावे दुबार असून 5291 मतदार मयत झालेले असताना देखील त्यांची नावे यादीत कायम आहे तसेच सागवान येथील एकाच घरात विविध जाती धर्माचे 126 लोक राहत असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला.