अपील असल्याने दिग्रस नगर परिषदेच्या तीन प्रभागांची निवडणूक येत्या २० डिसेंबर रोजी होणार आहे. आज दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असून प्रचाराला चांगलीच गती आली आहे. प्रभाग क्रमांक २-ब, ५-ब आणि १०-ब या तिन्ही प्रभागांतून प्रत्येकी ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या घरोघरी जाऊन, तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेत मतदान करण्याचे आवाहन करत असून निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला