पनवेल: ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे येथे ट्रक पलटला; सकाळपासून दुपारपर्यंत वाहतूककोंडी, वाहनचालकांना झाला त्रास
Panvel, Raigad | Apr 10, 2024 नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी होऊन शेकडो वाहने अडकली आहेत. १० एप्रिल रोजी सकाळी सहा ते साडे सहा वाजता हा ट्रक पलटी झाला होता. त्यामुळे दुपारी देखील या मार्गावर वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांकडून ट्रक हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही.