आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र व भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे सालाबादप्रमाणे या वर्षी ही यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक दाखल झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारध पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, मंदिर समिती व ग्राम पंचायत च्या वतीने योग्य ती खबरदारी केली जात आहे.