उल्हासनगर मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा गाड्यांची तोडफोड करून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. तोडफोड करणारे व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सातत्याने उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरामध्ये काही व्यक्तींकडून नागरिकांना धमकी देण्यात वस्तूंची गाड्यांची तोडफोड करणे असे कृत्य केले जात आहे, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशी करत आहेत. घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.