हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेचा मृत्यू अंबड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल अंबड (जि. जालना) : हुंडा न दिल्याच्या कारणावरून तसेच घरगुती कामावरून टोमणे मारत विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यात उघडकीस आली आहे. या छळामुळे पुनम धर्मराज पाटील (वय २३, रा. रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) हिचा मृत्यू झाल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पुनम हिला लग्नात हुंडा दिल