महाड: किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी.
Mahad, Raigad | Nov 30, 2025 सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खाजगी मिनीबसला नांदगाव बुद्रुक येथे पलटी होऊन अपघात झाल्याने सहाजण जखमी झाले असून यामध्ये चार विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे. अक्षरा अजय ढोकळे वय 16, आदिती रवींद्र खेरमोडे वय 16, आदिती दीपक खाडे वय 16, सिद्धी दीपक ढोकळे वय 16, योगेश वसंतराव जाधव चालक वय 35 जगन्नाथ विश्वास येवले, शिक्षक वय 45 अशी सर्व जखमींची नावे असून ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत.