लाखनी: बोरगावमध्ये वादातून मारहाण; आरोपीवर लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बोरगाव येथे कंम्पाउंड वॉल बांधकामावरून झालेल्या वादातून एकाला मारहाण केल्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी नरेंद्र मनराज कुसुमे (वय 26, रा. बोरगाव, ता. लाखनी) याच्याविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी चिडून गोंधळ घालत शिवीगाळ करू लागला. त्यानंतर हातातील फावडा घेऊन नव्या बांधकामावरील भिंतीवरून उडी मारत फिर्यादीकडे जाऊन मारहाण केली. यात फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर दुखापत झाली.