गोंदिया: नगरपरिषद निवडणुकीला घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला घेऊन प्रदेश सदस्य अरविंद गजभिये व आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक घेण्यात आली. आगामी नगरपरिषद निवडणुकीला समोर ठेवून संघटन मजबूत करणे, प्रत्येक प्रभागात बुत सशक्तिकरण, विकास कार्य योजना आदी विषयावर यावेळी विस्तार पूर्वक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजपच्या जिल्हाध्यक्ष सिता रंहागडाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.