हज यात्रेकरिता बुकिंग करून देतो असे म्हणून फिर्यादी कडून वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपी विरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दिली आहे.फिर्यादी सय्यद अब्दुल हमीद सय्यद अब्दुल मजीद (सेवानिवृत्त कर्मचारी) वय ६० वर्ष रा. चहेलपुरा मंगरुळनाथ यांनी फिर्याद दिली की, आरोपी सय्यद तनवीर उल्हाह अजमत उल्हाह इमानदार आणि सय्यद नईम इनामदार अजमतउल्लाह इनामदार रा. बागवान पुरा अकोट यांनी त्यांची फसवणूक केली आहे.