यवतमाळ: मी प्रामाणिक माणूस, प्रामाणिकच काम केले ; माजी आमदार संदीप बाजोरिया
मी प्रामाणिक माणूस आहे, आतापर्यंत शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रामाणिक काम केले. मात्र, 8 जुलै रोजी पक्षाचा राजीनामा दिला असून, अद्यापही कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही.मी जनतेचा सेवक आहे, म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी 2029 ची निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी दिली.