ढाका कुटुंबाने घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट
Beed, Beed | Sep 30, 2025 स्व. यश ढाका यांचे कुटुंबीयांनी, मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी कुटुंबीयांनी सांगितले की, आतापर्यंत तीन आरोपी अटकेत आहेत. मात्र, उर्वरित आरोपींनाही तात्काळ अटक व्हावी.तसेच या प्रकरणातील आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.स्व. यश ढाका यांचे वडील देवेंद्र ढाका यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.