गंगाखेड: शिवाजीनगर तांडा परिसरात एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टरवरील एक ठार,बस चालकावर गुन्हा दाखल
गंगाखेड परळी रस्त्यावर शिवाजीनगर तांडा परिसरात 15 डिसेंबरच्या सायंकाळी साडे सातच्या सुमारास एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर वरील एक जण ठार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी 16 डिसेंबरला पहाटे चार वाजेच्या सुमारास एसटी बस चालकावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.