धुळे: संविधान दिना निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आयुक्तांनी केले अभिवादन.
Dhule, Dhule | Nov 26, 2025 धुळे : संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्याच निमित्ताने 26 नोव्हेंबर बुधवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त तथ