कात्रड (ता. राहुरी) येथे वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने अटक केली आहे. 28 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गोपनीय माहितीच्या आधारे नेवासा फाटा येथे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीत त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.