मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत जिल्हा निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळे आज पार पडले. या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत तुमसर अंतर्गत आडकुटोला येथील नाली बांधकाम, ग्रामपंचायत तेढा येथे तुकडोजी महाराज मंदिर परिसरात गट्टू लावणे, तसेच महाजनटोला येथे सिमेंट रस्ता बांधकाम या कामांचा समावेश आहे.या भूमिपूजन सोहळ्यास पंचायत समिती उपसभापती रामेश्वरजी महारवाडे, तुमसरच्या सरपंच योगिता ताई देशमुख, आदी उपस्थित होते.