आजचा दिवस तालुका वासियांसाठी अत्यंत दुख:द असून तीन गावातील तीन युवकांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यू झाला त्यामुळे तालुका हादरून गेला आहे ही घटना आज दि. 8 जानेवारी रोजी घडली आहे 8 जानेवारी हा दिवस तालुकावाशीयांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला तालुक्यातील ताडगांव येथील संदीप वसंत नाकाडे या 42 वर्षीय इसमाने अर्जुनी मोरगाव रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडी समोर येऊन आपले जीवन संपविले संदीप नाकाडे असे त्याचे नाव असून