यवतमाळ: ई पीक नोंदणी साठी 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्यापही ई पिक नोंदणी केली नसल्यामुळे ई पिक पाहणीसाठी 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सर्वर डाऊन मुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पेरणी केलेल्या पिकाची माहिती स्वतःच नोंद करायची आहे व आपल्या शेतातील पिकाच्या नोंदी स्वतःच ठेवायच्या आहे. यासाठी शासनाने ई पीक पाहणी हे स्वतंत्र ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.शेतकऱ्यांनी या ॲपवर जाऊन शेतातील पिकाची नोंदणी करायची आहे....