जळकोट: आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश.. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवनासाठी प्रशासकीय मंजुरी
Jalkot, Latur | Oct 20, 2025 जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा मुक्काम झाल्यास राहण्याची सोय व्हावी तसेच त्यांना भौतिक व मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून नवीन शेतकरी भवनासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे