नांदुरा: शासकीय मदतीतून कोणत्याही बँकेला कर्जाचे हप्ते वसूल करता येणार नाही–तहसीलदार अजितराव जंगम
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे कोणतीही आर्थिक मदत जसे पिक विमा, नुकसान भरपाई किंवा इतर शासकीय अनुदानाच्या रकमेतून कोणत्याही बँकेला कर्ज हप्ते वसुल करता येणार नाही.जर कोणत्याही बँकेने या आर्थिक मदतीतून हप्ते वसूल केल्यास किंवा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावल्यास संबंधित बँक व्यवस्थापकावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे निर्देश तहसीलदार अजितराव जंगम यांनी नांदुरा तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहे.