हवेली: वाकड येथे हातचलाखीने पळवले ७.७२ लाखांचे दागिने
Haveli, Pune | Nov 5, 2025 अंगावर शॉल टाकून भविष्य पाहण्याच्या बहाण्याने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण सात लाख ७२ हजारांचा ऐवज दोन अनोळखी व्यक्तींनी चोरून नेला. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सकाळी डांगे चौक, वाकड येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.