महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या रणधुमाळीत आज एक आगळे वेगळे चित्र पाहायला मिळाले. येथे प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडून आलेल्या उमेदवारांनी चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेतला आणि मी ओबीसी मधून निवडणूक लढलो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. यावेळी जोरदार नारेबाजी देखील करण्यात आली.