आमगाव परिसरातील शेतातून बोअरवेलमधील ३६ हजार २०० रुपये किमतीची काळ्या रंगाची कॉपरची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १३ ते १४ जानेवारी दरम्यान घडली असून सरोज रमेश कावळे (३२, रा. ठाणा) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.