हिंगणा: हिंगणा मार्गावरील ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार, दोन तरुणींची केली सुटका, पोलीस निरीक्षक राहुल शिरे
Hingna, Nagpur | Sep 17, 2025 हिंगणा मार्गावरील वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळील ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.राजेंद्र नगर ले-आउटमधील रेणुका कॉम्प्लेक्समधील ओयो अर्बन रिट्रीटमध्ये हा प्रकार सुरू होता. खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळाल्यावर तेथे डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्याने इशारा दिल्यावरतेथे पोलिसांनी धाड टाकली.