मावळ: भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल
Mawal, Pune | Oct 21, 2025 मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर एका भरधाव कार चालकाने धडक दिल्याने अन्य वाहनात असलेल्या एका 78 वर्षीय व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमनाथ दवारकाप्रसाद शर्मा असे आरोपी चालकाचे नाव आहे.