बुलढाणा: मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी,जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य आक्रोश मोर्चा
बुलढाणा येथील मयुरी बुडुकले हिचा 10 मे रोजी जळगाव खा. येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नाच्या चार महिन्यानंतरच मयुरीचा मृत्यू झाला,तिने आत्महत्या केल्याचं सासरकडच्या लोकांकडून दाखवण्याचा प्रयत्न झाला,मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या भावना माहेर कडील नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी बुलढाण्यात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलं.