गोंदिया: विदर्भ महसूल संघटनेचे संविधान चौकात भर पावसात धरणे आंदोलन, गोंदिया जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी कोतवाल संघटनेचा सहभाग
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 विदर्भ महसूल संघटनेने संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन केले.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना महसूल सेवा कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाहीत.त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवकांना खूप अन्याय सहन करावा लागतो.महसूल सेवक कोतवाल पदाची महसूल यंत्रणेतील स्थान व कार्य लक्षात घेता महसूल सेवक कोतवाल यांना महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सुविधा देण्यासाठी दर्जा द्यावे.