उत्तर सोलापूर: मनोहर सपाटे खोटारडा माणूस: माजी उपमहापौर दिलीप कोल्हेंचा माजी महापौर सपाटेंवर हल्लाबोल...
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे हे खोटारडे माणूस असून, त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा थेट आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना केला आहे. कोल्हे म्हणाले, “आमदार देवेंद्र कोठे यांनी चौकशी लावली असे सपाटे सांगतात, परंतु प्रत्यक्षात मीच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतरच पुढील कारवाई झाली,” असा दावा त्यांनी केला.