रत्नागिरी: राजापुरातील देवाचेगोठणे-करंबेळकरवाडी, दापोलीतील उटंबर येथे होणार नव्या जेटी
मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली.