राहाता: अटी शर्थी शिथिल करत सरसकट पंचनामे करण्याची विखे पाटलांची घोषणा. आपत्ती काळात राजकारण करू नये.विरोधकांना टोला..
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व अटी शर्थी शिथिल करत मदत करण्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे माध्यमाशी बोलताना केली. तसेच या नाजूक काळात राजकारण न करता शक्य तितकी मदत करावी असा आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं.