समुद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार: वडगाव शेत शिवारातील घटना:शेतकऱ्याचे ६० हजार रुपये किमंतीचे नुकसान
समुद्रपूर: वडगाव शेत शिवारात झाडा खाली बांधून असलेल्या बैल जोडीत एका बैलावर वाघाने हल्ला चढवित जागीच ठार केले आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार वडगाव येथील शेतकरी विजय मुन यांनी त्यांची बैलजोडी नेहमी प्रमाणे शुक्रवारी सायंकाळी शेतातील झाडाखाली बांधून चारा पाणी करून घराकडे परत आले याच दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने बैलजोडीवर हल्ला चढवित एका बैलाला ठार केले शेतकरी विजय मुन हे सकाळी शेतात गेले असता हि घटना त्यांच्या निदर्शनास आली.