भंडारा: भंडाऱ्यात एचपी गॅसचा प्रचंड तुटवडा; आठ-आठ दिवस ओटीपी मिळेना, सर्वसामान्यांची चूल पेटणार कशी?
भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून एचपी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, सिलेंडरसाठी नोंदणी करूनही ग्राहकांना आठ-आठ दिवस ओटीपी मिळत नसल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅस संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून जंगलातून सरपण आणायचे तर वन्यप्राण्यांची दहशत आणि सरकारी नियमांमुळे तेही कठीण झाले आहे, अशा पेचात नागरिक अडकले आहेत. "उपाशी राहायचे का?" असा संतप्त सवाल विचारला जात असतानाच, जिल्हा पुरवठा विभागाने या दिरंगाईची चौकशी करून पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा संतप्त...