कोरेगाव: कोरेगाव भूमिअभिलेख विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप;टाळेठोक आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
कोरेगाव तालुक्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिनाभर होत आला असताना ऊसतोड झालेल्या शेतकऱ्यांनी शेतमोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाची धाव घेतली आहे. मात्र कार्यालयातील वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर घट्ट बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी, उद्धट वागणूक आणि मनमानी यामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. यावर जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी तातडीने लक्ष न दिल्यास कार्यालयास टाळे ठोक आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता दिला आहे.