लाखनी: लाखनी येथे तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लाखनी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये शिक्षकांनी वयक्तिक तसेच सांघिक खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. वैयक्तिक गटात लांब उडी, गोळा फेक, भाला फेक आणि धावणे (रेनिंग) या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांघिक खेळांमध्ये व्हॉलीबॉल, खो-खो आणि बॅडमिंटन यांचा समावेश होता. सर्व स्पर्धांमध्ये शिक्षकांनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत क्रीडाभाव जपला.