धुळे: नजर हटली, दुर्घटना घडली! धुळ्यात गल्ली नंबर चार परिसरातून दुचाकीवरून लाखोंची रोकड लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Dhule, Dhule | Sep 30, 2025 धुळे ग.नं.४ मध्ये धुलीया ट्रेडर्सचे मालक गोकुळ बधान दुकान बंद करताना दुचाकीवर ठेवलेली पाच- सहा लाखांची पिशवी अज्ञात चोरट्याने लांबवली. क्षणात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बधान यांनी आरडाओरडा केला तरी चोरटा दुचाकीवरून पसार झाला. या घटनेने व्यापारी घाबरले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आझाद नगर पोलिस फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.