लोणी काळभोर, हडपसर परिसरात भाईगिरी करणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून २ पिस्टल व एक जिवंत काढून जप्त केले आहे.शुभम कैलास कामठे (वय ३०, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) आणि त्याचा साथीदार शुभम श्रीमंत रसाळ (वय १९, रा. पावर हाऊस शेजारी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.