भारतीय जनता पक्षाने पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरण मुख्य आरोपी असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर केला होता. आरोप केलेल्या चौधरी यांना आता भारतीय जनता पक्षात जाहीररीत्या प्रवेश देण्यात आला आहे. पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाध्यक्ष भाजप बदल राजपूत यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत तीन कार्यकर्त्यांसह काशिनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.