शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी गैरप्रकारासाठी वापरून मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सरकारी निधीचा गैरवापर करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, संबंधित शालार्थ आयडीमध्ये बनावट नोंदी करून वेतन व भत्त्यांची रक्कम चुकीच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली.