दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकावर ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याची घटना दि. २२ डिसेंबरच्या रात्री घडली. सविस्तर असे की शुभम उरपाटे (वय २४, रा. अंबिका नगर, दिग्रस) याने सौरभ अंबुरे यांना शिवीगाळ करत जुना वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता शुभम उरपाटे याने ब्लेडने हल्ला करून सौरभ अंबुरे यांना जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेप्रकरणी जखमी सौरभ अंबुरे यांचे भाऊ करण याने पोलिसात तक्रार दिली.