अहिल्यानगर महापालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा ह्या एकनाथ शिंदे गटाने मागितले आहे